Total Pageviews

Sunday, 10 November 2013

Devyani - 10th October 2013 : Ep 497

http://www.youtube.com/v/vy1MloC98SU?autohide=1&version=3&attribution_tag=-SLaSITvw4EsJMLCqZ7o_Q&autoplay=1&showinfo=1&autohide=1&feature=share





Devyani - 9th October 2013 : Ep 496

http://www.youtube.com/v/qPp6ORCDIx8?autohide=1&version=3&showinfo=1&attribution_tag=J1xWbLS2p3baMc8IT42Zzw&autohide=1&autoplay=1&feature=share

Devyani - 8th October 2013 : Ep 495

http://www.youtube.com/v/z4c6bVEKAGg?autohide=1&version=3&attribution_tag=JkvDT04ztN4QkveaFYxMsA&autoplay=1&showinfo=1&feature=share&autohide=1

Monday, 21 October 2013

देवाघरी गेलेल्या एका स्त्रीची हि कळकळ.
बाळ माझं बघ कसं.....दुधासाठी रडतंय,
बोबड्या त्याचा शब्दात....
माझ्यासाठी हंबरडा फोडतंय,
दारातली तुळस बघ माझ्या....
कशी माझ्याविन सुकलीय,
तिला पाणी नाही घातलं....
तिची फांद लेक माझी बघ....
दारात माझी वाट बघत बसलीय,
गुणाची आहे रे पोर माझी....
दारा तएकटीच रुसलीय.
बछडा माझा......आता शाळेतून येईल,
"आई कुठे गेली??"..विचारत....
घर डोक्यावर घेईल...
नवरा माझा भोळा आता दमून भागून
येणार,
दमला असेल रे तो.....त्याला पाणी कोण
देणार?
गाय माझी बघ कशी....गोठ्यात
चाऱ्याविना उभी,
माज्यावीन ती चारा खात नाही रे
कधी....
संसार माझा मी थोडा सावरून....आवरून
येते,
भेटणार नाहीत पुन्हा...
माझ्या लेकरांचा मुका घेऊन येते.
माझ्या नवऱ्याचे....माझ्यावर खुप खूप प्रेम रे....
माझंही त्याच्यावरचे प्रेम त्यांना सांगून
येते.....
सोड रे देवा मला ....थोडा वेळ जाउ दे,
कांदाभाकर माझ्या माणसांसोबत खाऊ दे,
तुझा स्वर्ग नको......मला माझ्या स्वर्गात
राहू दे...

श्री गणेश मंदिर, कोळेवाडी(नवसाला पावणारा बाप्पा)
ता. कराड
हे मंदिर कराड-ढेबेवाडी या रस्त्यावर आहे. ते एका टेकडावर कोळेवाडी जवळ वसलेले आहे. बरेच वाटसरू या मंदिरात दर्शन घेतात आणि पुढच्या प्रवासाला लागतात. संकष्टी चतुर्थी आणि अगारखी चतुर्थी'ला या मंदिराबाहेर जत्रा भरते. कराड तालुक्यातले बरेच भाविक बाप्पाच्या दर्शनाला येथे येतात, तसेच काही जवळच्या गावातले भक्त चालत येतात

Saturday, 19 October 2013

गुलाबी थंडी हवीहवीशी,
जुळती नाती नवी-नवीशी.

'गारवा' गाणे कुडकुडत गुणगुणणे,
फुटल्या ओठांचे हलकेच हसणे.

हात चोळणे खांदे उंचावून,
स्वेटर न घालणे थंडी लागून.

एकच कप चहा दोघांनी पिणे,
खूप थंडी आहे....पुन्हा पुन्हा सांगणे.

पतंग उडवण्यासाठी धडपडने,
पतंगासोबतची उंचच स्वप्ने.

कधी रुसणे ......कधी रागवणे,
बोलण्यासाठी पुन्हा कारण शोधणे.

गोड बोलूया ... एकमेकांना सांगायचे,
तिळगुळ वाटत - घेत फिरायचे,

या वर्षीच्या गारव्यात एकदा
देईन वचन अन करेन वादा.,

स्वप्नासाठी तुझ्या प्रार्थना करीन
हवे तुला ते सारे मागेन

एकदा एक मुलगा त्याच्या प्रेयसीला Challenge करतो कि,


"एक पूर्ण दिवस तू माझ्याशिवाय राहून दाखवायचे,
मला फोन, मैल, मेसेज काहीही करायचे नाही ............................
जर तू अस करून दाखविलेस तर मी तुझ्याशी लगेच लग्न करेन ........!!!"

मुलगी म्हणाली, "खरे तर मला एक क्षण सुद्धा तुझ्या शिवाय राहायचे नाहीये ........... पण तरीही आज तू मला challenge केले आहेस म्हणून मी एक पूर्ण दिवस काहीही contact न करण्याचे challenge स्वीकारत आहे !".


एक पूर्ण दिवस काहीही contact न करता जातो.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ती मुलगी खूप उत्सुकतेने त्या मुलाला भेटायला त्याच्या घरी जाते .................. पण ...............
घरात पोचताच ती तिच्या प्रियकराची पांढर्या शुभ्र कापडात ठेवलेली व वरती हार घातलेली body बघते


आणि तिला एकदम खूप मोठा धक्का बसतो .............
तिला हे अस कस झाले ??? , का झाले ????? .....काहीच कळत नव्हते..............
रडावे तर अश्रूंचा पूर येईल, शांत तर राहातच येत नव्हते ...... कंठ दाटून आलेला ......
सर्व आठवणी डोळ्यासमोर एक क्षणात उभ्या राहिल्या ........


तेव्हड्यात त्याच्या आईने त्याने तिच्यासाठी लिहिलेली चिठी तिच्याकडे दिली त्यात लिहिले होते ,

" कर्करोगाच्या आजरामुळे माझ्या कडे शेवटचा एकच दिवस राहिला होता म्हणून मला तुला challange करावे लागले ................आणि तू ते करून दाखविलेस, Baby...... , आता फक्त हेच तुला रोज करायचे आहे .......!!!"
sHree

जा निघून तू ,केले माफ तुला
जीव माझा इवलासा दिला दान तुला
कर त्याचे काहीही पुन्हा मागणार नाही मला
रडतं असतो सारखा जर समजून संग त्याला
स्वभाव काय सांगू ओंजळीत ठेव त्याला
भास सारखा होतो न आठवत राहतो तो तुला
मन खूप मोठे आहे थोड समजून घे त्याला
ओजाळीतल्या ओल्याव्यासारखे जपले आहे मी त्याला
जपून कर वार थोडे घाव पडेल त्याला
असह्य अशा वेदना दिसणार नाही तुला
त्याच्या नशिबात काही नाही पण घडव थोड त्याला
रख रख त्या उन्हासारखे जळतो तो स्वतः
घेऊन जा सारे काही पण उरणार काय मला
एकांतात राहण्यापेक्षा जाळून टाक या देहाला
फुल आणून थोडीशी उचल मुठीत राखेला
कवटाळून हृदयाशी आता तरी बोल मी मानल रे तुलाhttps://www.facebook.com/shree390
एक मैत्रिण आहे माझी...
माझ्या सोबत हसणारी
मी रडल्यावर मात्र...... माझे डोळे पुसणारी

एक मैत्रिण आहे माझी...
नेहमी सलवार-कमीज़ घालणारी
साधेपणातच सौंदर्य आहे.... हे सिद्ध करणारी,

एक मैत्रिण आहे माझी...
हिशोबिपणे वागणारी,
तिच्या या सवयीमुळे.....माझे पैसे वाचवणारी,

एक मैत्रिण आहे माझी...
कठोरतेने वागणारी,
जरा ओरडलो की मात्र..... मुसू मुसू रडणारी,

एक मैत्रिण आहे माझी...
माझ्यावर सारखी चिडणारी,
न कळत मात्र.... माझ आयुष्य फुलवणारी,

एक मैत्रिण आहे माझी...
सर्वाना हवीहवीशी वाटणारी,
माझ्याशिवाय मात्र.... स्वतःला अपूर्ण मानणारी
का कळत नाही पण हल्ली मन जरा कठोर झालंय
प्रेम या शब्दातला जिव्हाळा थोडा कमी झालाय
प्रेम प्रेम प्रेम बस झाल आता
अरे ! एखादी गोष्ट आयुष्यात आपली होणारच नाही मग त्या गोष्टीचा विचार करावा का
तिलाही माहितीये कि ती माझी होऊ शकत नाही
आणि मलाही माहितीये कि मी तिचा होऊ शकत नाही
दोघांची कळकळ अशी झालीये जस अळवाच पान आणि त्यावरचा थेंब
स्पर्श होऊ शकेल पण एक जीव उभ्या जन्मात शक्य नाही
माझ्या मनातल्या भावना तिच्या मनात कधीच पोचल्यात आणि तिच्या मनातल्या
भावनाही माझ्या मनात कधीच पोचल्यात
दोघांचीहि भावनेत प्रेम आहे दोघानाही माहितीये पण या भावना व्यक्त का होत नाहीत
नाही ! त्या कधीच होणार नाहीत
त्यामागे एकाच कारण असाव दोघानाही एकाच बंधनान जखडून ठेवलंय
"संस्कार"


आलीस माझ्या आयुश्यात सोनेरी पहाट बनुन,
देशील मला आयुष्यभराची साथ् माझी प्रेयसी बनुन............

मन माझे उदास होते जणु कोमेजलेले फुल,
आता तुझ्याच सोबत मांडायचि आहे मला जन्मो-जन्मीची चुल.........

कशी अवतरलिस तु या भुतालावर काय सांगु,
सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या आता देवाकडे काय मागु...........

असायचो एकटाच मी विरहाच्या क्षणात बुडालेला,
कस समजवु तुला प्रेमावरचा विश्वासच माझा उडालेला.......

तुझ्या येण्याने परत मनात अंकुर फुलवला आहे,
माझ्या अंगणात मी परत स्वप्नांचा झूल़ा झुलवला आहे.........

ह्या झुल्यावर आयुष्यभर तुझ्यासंगे मला झुलू दे.....
आणि तुझ्या मिठीतच नेहमी हि सोनेरी पहाट मावळू दे.
https://www.facebook.com/shree390
https://www.facebook.com/shree390
प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

भावना तुझ्या शुद्ध असतील, तर
तीही त्यात वाहून जाईल
मनावर अमृत सरी झेलत
तीही त्यात न्हाहून जाईल..

विचार तुझा नेक असेल, तर
तीही तुझा विचार करेल
हृदयाच्या तिच्या छेडून तारा
सप्तसूरांचा झंकार उरेल..

आधार तुझा बलवान असेल, तर
तीही तूझ्या कवेत वाहील
मग, कितीही वादळं आलीत
तरी प्रित तुमची तेवत राहील..

आशा सोडण्या इतकं
जिवन निराशवादी नाही रे
तिला न जिंकता यावं इतकं
मानवी हृदय पौलादी नाही रे..

पण, मित्रा जर ती नाहीचं आली
तरीही तू हार मानू नकोस
तू तर प्रामाणिकपणे खेळलास
आयुष्याला जुगार मानू नकोस..

शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी

https://www.facebook.com/shree390

दररोज घरी येता जाताना
नजरेत तुलाच शोधायचे ,
आणि कधी तू दिसलास तर
आपोआप ओठांवर हास्य उमलायचे ,

दिवसभर college असल्यामुळे
तुला फार काळ न्याहाळता येत नव्हतं,
पण जेव्हा केव्हा समोर येशील
तेव्हा नकळत हात तुला hi करण्यासाठी उठायचे,

एके दिवशी बोलता बोलता
मनातल्या feelings बोलून गेले,
आणि त्यातूनच एक
सुरेख नाते जन्माला आले,

बरेच दिवस झाले
दोघे सुखात होते,
पण अचानक काय झाले माहित नाही
पण त्याने बोलणे बंद केले,

त्याचा अशा वागण्याने
तिने खूप सोसले,
पण मग हळूहळू स्वतःला सावरले ,
आणि पुन्हा एकदा नव्याने जगणे सुरु केले,

लोकांचा नजरेत आता ती खुश होती,
पण मनात मात्र एकच आस होती,
एकदा ....एकदा तरी परत येशील का माझ्याकडे ,
पुन्हा एकदा अनुभवायला त्याच प्रेमाचे गोडवे.

 https://www.facebook.com/shree390
एका मुलीने ने देवाला विचारलं प्रेम काय असत ?
देव म्हणाला

बागेतून एक फुल घेवून ये.

ती मुलगी फूल आणायला गेली ,

तिला एक फूल आवडल ,

पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत ,

ती पुढे चालली गेली ,

पण तिला चांगल फूल नाही मिळाल ,

जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली ,

तेव्हा ते फूल तिथे नव्हत ,

तिला खूप पश्चाताप झाला ,

तिने देवाला येऊन सांगितलं ,

तेव्हा देव म्हणाला , " हेच आहे प्रेम 

https://www.facebook.com/shree390

दूरवर असलेल आकाश जेव्हा ठेंगण वाटत
जमिनीवर चालताना उडतोय आपण
असा भास होतो
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.

तो कुठे तरी जवळपासच असेल
या विचारांनी नजरेच भिर भिरण
आणि तो दिसताच मात्र
नजरेच आपसूकच झुकण
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.

भावना मनात फुलतात
पण शब्दात सागता येत नाही
गहिवर्लेल्या शब्दाना ओठांनी वाट अड्तात
तर डोळ्यांनी बोलल्या जातात
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.

सर्व त्रुतु मनाला गवसतात
त्याच येन गार हवेचा शहारा
आणि नाव घेताच मनात
विज चमकन......
तो नसताना मात्र कोरड पडन
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.

एक सुंदर लेख......

पटकन "सॉरी' म्हणायला शिका; "इगो' सोडून द्या -- Say Sorry Darling

दोन भिन्न व्यक्ती, भिन्न वातावरणात वाढलेल्या, त्यांच्या आवडीनिवडी,
सवयीही वेगवेगळ्या; पण दोन-तीन भेटींतच सगळे आयुष्य एकत्र घालवायचा निर्णय घेतात. मग आनंदी व उत्साही वातावरणात, अखंड प्रेमात बुडालेले ते दोन जीव लग्नाच्या बंधनात बांधले जातात. "ऍरेंज्ड्‌ मॅरेज' असो वा "लव्ह मॅरेज'; दोघे ओळखीचे असोत की अनोळखी, जेव्हा ते सतत एकमेकांबरोबर असतात,
तेव्हाच खरी ओळख होते. लग्नानंतर नवीन नाती, नवीन माणसे या सगळ्या नव्या नवलाईत पहिली काही वर्षे भुर्रकन उडून जातात; पण हाच काळ खूप महत्त्वाचा असतो. एकमेकांना समजून घेण्यासाठी. अगदी छोट्या छोट्या सवयींपासून
स्वभावापर्यंत सगळे हळूहळू उलगडत जाते. एकमेकांचे सूर जुळतात. संसाराचा
पाया तयार होतो. एक अतूट नाते तयार होते. समोरची व्यक्ती ही आपली आहे, ती
जशी आहे, तशी (गुण-दोषांसकट) तिला स्वीकारता आले पाहिजे. लग्नानंतर
एक-दोन वर्षे नवलाई टिकून असते. मग दोघांच्याही नकळत बदल घडतात. ही तीच
व्यक्ती आहे का, अशा प्रश्‍न पडावा इतपत बदल घडतात! का परिस्थिती बदलते?
नेमके काय होते कुणास ठाऊक! तिच्याशी बोलण्यास, भेटण्यास कायम तत्पर
असणारा "तो' अचानक बिझी होतो. तिचा फोन येताच, "घरी यायला उशीर होणार
आहे,' किंवा "पाच मिनिटांनी फोन कर' इत्यादी सांगतो. तिच्यासाठी वाट्टेल
तेवढे महागाचे गिफ्ट घ्यायला, तिला सरप्राईज द्यायला आतूर असलेला "तो'
तिच्याबरोबर जाताना आधी पाकीट तपासून पाहतो. "ती'सुद्धा काही कमी नसते.
त्याचासाठी नवनवीन पदार्थ बनवणारी "ती' आता त्यालाच फोन करून सांगते
"येताना पार्सल घेऊन ये' किंवा "पोहे खाशील का?' "घरी कधी येणार?' "कुठे
आहेस?' इत्यादी. नेमके काय झालेले असते? इतका बदल कशामुळे झालेला असतो?
उत्तर सोपे आहे ः जबाबदाऱ्या वाढल्या की प्रायॉरिटीज्‌ही बदलतात. संसार
म्हटले की, "भांडण' आलेच; पण रागात कोणी काही बोलले तर ते सोडून देता आले
पाहिजे. "मी, माझे, माझी माणसे' हे सगळे गळून पडले पाहिजे व आपुलकीची
भावना निर्माण झाली पाहिजे. अर्थातच यात दोघांचाही समप्रमाणात सहभाग असेल
तरच हे शक्‍य आहे.
संसार सुखी करायचा असेल तर "सप्तपदीचे सात मंत्र' दोघांनीही अमलात आणावेत.

1) एकमेकांबद्दल प्रेम, विश्‍वास आदर बाळगा

2) समोरच्याने बदलण्याची अपेक्षा न धरता स्वतःत बदल घडवा

3)ज्या दिवशी भांडण होईल, "त्याच' दिवशी मिटवा (अबोला धरू नका). बोलून
विचार करण्यापेक्षा विचार करून बोला.

4) स्वतःसाठी वेळ द्या. (छंद जोपासा. मित्र-मैत्रिणींबरोबर थोडा वेळ
घालवा. स्वतःचे वेगळे विश्‍व निर्माण करा). एकमेकांना मोकळीक द्या; तरच
स्वातंत्र्याचा खरा अर्थ उमजेल.

5) एकमेकांना वेळ द्या (दोघेच फिरायला जा. गप्पा मारा.)

6) पटकन "सॉरी' म्हणायला शिका व "इगो' सोडा (पुरुषीपणाचा, स्त्रीत्वाचा,
पैशाचा, पदाचा इत्यादी)

7) प्रेम आहेच; पण ते व्यक्त करणेही खूप गरजेचे असते. छोट्या-मोठ्या
प्रसंगांमधून काळजी, आधार, कौतुक, प्रेम हे भाव व्यक्त होऊ द्या
(उदाहरणार्थ आय लव्ह यू, तू आज छान दिसतोस, किती दमलीस तू...इत्यादी)

संसार सुखी असेल तर घरात सुख-समाधान व शांती

नांदेल. मग दिवसभर कुठेही
असा; संध्याकाळी सगळ्यांनाच घरी परतण्याची ओढ असेल; पण तरीही वाढत्या
जबाबदाऱ्यांचे व कामामुळे येणाऱ्या तणावांचे पडसाद आपल्या व्यक्तींवर
उमटणारच. कधीतरी वाद होणारच;
पण त्यांचे प्रमाण असेल
"जेवणातल्या मिठाएवढेच

आज माझंच मला कळून चुकलं,
मलाच नातं नीट जपता नाही आलं.
आज जेवून झाल्यावर बाबा बोलला,"मी आता रिटायर
होतोय, मला आता नवीन कपडे नको, जे असेल ते
मी जेवीन, जे असेल ते मी खाईन, जसा ठेवाल
तसा राहीन."

काहीतरी कापताना सुरीने बोट कापलं जावं,
आणि टचकन पाणी डोळ्यात यावं, काळीजच तुटावं,
अगदी तसं झालं.
एवढंच कळलं कि आजवर जे जपलं ते सारंच फसलं.

का बाबाला वाटलं तो ओझं होईल माझ्यावर ?
मला त्रास होईल जर तो गेला नाही कामावर ?
तो घरात राहिला म्हणून कोणी ऐतखाऊ म्हणेल,
कि त्याची घरातली किंमत शून्य बनेल.
आज का त्याने दम दिला नाही,"काय हवं ते
करा माझी तब्बेत बरी नाही, मला कामावर
जायला जमणार नाही."

खरंतर हा अधिकार आहे त्याचा सांगण्याचा, पण
तो काकुळतीला का आला?
ह्या विचारातच माझं मनं खचलं.
नंतर माझं उत्तर मला मिळालं,
जसा जसा मी मोठा होत गेलो,
बाबाच्या कवेत मावेनासा झालो.
नुसतं माझं शरीर वाढत नव्हतं,
त्याबरोबर वाढत होता तो अहंकार, आणि त्याने वाढत
होता तो विसंवाद,
आई जवळची वाटत होती, पण बाबाशी दुरावा साठत
होता.

मनाच्या खोल तळापर्यंत प्रेमच प्रेम होतं, पण ते
शब्दात सांगताच आलं नाही,
बाबानेही ते दाखवलं असेल, पण दिसण्यात आलं नाही.
मला लहानाचा मोठा करणारा बाबा, स्वःताच
स्वतःला लहान समजत होता.
मला ओरडणारा - शिकवणारा बाबा, का कुणास ठाऊक
बोलताना धजत होता.

मनाने कष्ट करायला तयार असलेल्या बाबाला, शरीर
साथ देत नव्हतं, हे त्या शून्यातून सारं उभं
केलेल्या तपस्वीला, घरात नुसतं बसू देत नव्हतं. हे
मी नेमकं ओळखलं.

खरंतर मी कामावर जायला लागल्यापासून, सांगायचच
होतं त्याला कि थकलायेस आराम कर, पण
आपला अधिकार नव्हे सूर्याला सांगायचा कि “मावळ
आता”.
लहानपणीचे हट्ट पुरवणारा बाबा,
मधल्या वयात अभ्यासासाठी ओरडणारा बाबा,
आणि नंतर चांगलं
वागण्यासाठी कानउघडणी करणारा बाबा,
आजवर सारं काही देऊन कसलीच अपेक्षा न ठेवता,
जेव्हा खुर्चीत शांत बसतो, तेव्हा वाटतं कि काही जणू
आभाळंच खाली झुकलं.


स्वप्नातल्या परीला, आज मी सत्यात पाहिले...
हळव्या त्या मनाला, मी ते हळूच सांगितले...
पाहून त्या परीला, माझे हे मन फुला सारख फुलले...
अन तिला समोरून जाताना पाहून,
"परत भेटू." अस ते हळूच बोलले...
 
ती: तु माझ्याशिवाय जगशील का रे?
मी नघुन जर गेले तर
दुसर्या कुणाचा होशील का रे?

तो: बस झोपताना तुझी आठवण येईल
झोपण मी सोडुन देईन
चालताला तुझा भास होईल
पायांना थारा देईन
सुखात तुझी उणीव भासेल
सुख मी विसरुन जाईन
मन तुझ्याकडे धाव घेईल
मनाला बांध घालीन
हसताना पापण्या ओल्या होतील
अश्रृंना मी आवरुन ठेविन
स्वप्नांत तुझा चेहरा दिसेल
मी स्वप्न बघण सोडुन देईन
तु जाशील तेव्हा रोखणार नाही ग तुला
पण आंतरीक ओढन तुला खेचुन आणिन
तुला शेवटच बघितल की
श्वासांना थांबविन
ह्दयाच धडधडण कायमच लांबविन
एवढ ऐकुन ती बिचारी पाघळळी
घट्ट मिठीत त्याच्या अलगद सामावली
''ईतक प्रेम करतोस शोन्या माझ्यावर
मी कध्धीच तुला सोडणार नाही
तुला सोडुन जाण्याची भाषा
परत कधीच करणार नाही'
प्रेमभंगाने तुटलेल्या ह्रदयाला,
का कधी सावरता येत नाही.....

मोडलेल्या कोवळ्या मनाला,
का कधी जोडता येत नाही.....

कसे विसरतात कोणी कुणाला,
हे कुणालाही सांगता येत नाही.....

प्रेम हे फक्त प्रेम असते,
प्रेमावर कुठलेच बंधन लाधता येत नाही.....

पण ???

हल्ली प्रेम फक्त नावालाच उरलय,
खरं प्रेम कुणाला कुणावर करता येत नाही.....

खरं प्रेम कुणाला कुणावर करता येत नाही.....

बरोबर ना ???


तुझ्या घरासमोरून जाताना
तिच खिडकी पाहिली,
मी पुढं गेलो
नजर मात्र तिथच राहिली
 
पैसे नसतात
तेव्हा झाडपाला खाऊनही दिवस
काढायची माणसाची तयारी असते.
पैसा आल्यावर हाच

झाडपाला तो महागड्या हॉटेलात ऑर्डरकरतो.पैसे नसतात तेव्हा माणूस सायकलने रपेटकरतो, पैसा आल्यावर मात्र हीच सायकलतो जिममध्ये व्यायामासाठी चालवतो.पैसे नसताततेव्हा रोजीरोटीसाठी त्याची पायपीटचालू असते. पैसे आल्यावर मात्र हीचपायपीटतो चरबी कमी करण्यासाठी करतो.माणूस स्वत:शीच प्रतारणा करीत असतो.पत नसली तरी लग्नकरायला एका पायावर तयार असतो,ऐपत असली की मात्र त्याला घटस्फोटहवा असतो.पैसे वाचवायला तो कधी बायकोलाचआपली सेक्रेटरी बनवितो, पुढेपैसा आला की सेक्रेटरीलाच बायको सारखेवापरतो.पैसे नसेल तेव्हा तो असल्याचे सोंग आणतो,पैसा असतो तेव्हा मात्र कंगाल असल्याचेनाटक करतो.माणसा रे माणसा. तू वास्तवतरी कधी स्वीकारतोस ?शेयर बाजाराला सट्टाबाजार म्हणातोसपण सट्टा लावतोस,पैसा वाईट असे म्हणतोस पण त्याचा मोहकाही सोडत नाहीस,मोठ्या पोस्टचा हव्यास नाही असेम्हणातोस पण डोळा मात्र ती पोस्टकधी मिळते इकडे असतो,जुगार आणि दारू वाइट म्हणतोस पणतिचा नाद काही तुला सोडवत नाही.माणसाचे खायचे दात व दाखवायचे दातवेगळे असतात.माणूस जे बोलतो ते कधी करत नाही,करतो ते कधी बोलत नाही.माणसाची कथनी वेगळी, करणी वेगळी !

आठवण ...., आठवण आहे....,

तिचं कामच आहे आठवत राहणे .., ती कधी वेळ काळ बघत नाही ..,
तिला वाटते तेव्हा येऊन जाते .., कधी हसवते तर .., कधी रडवून जाते ..!!https://www.facebook.com/shree390



माझी चुकी नाही किमी तुझ्याकडेसारखा बघत राहतो...
माझी चुकी नाही किमी तुला सारखा कॉलआणि मेसेज करतो.. . .
माझी चुकी नाही किमी तुला इतका लाईक करतो... . .
माझी एवढीच चुकी आहेकि मी तुझ्यावर

माझ्यापेक्षा हि खूप खूप खूप जस्त प्रेम करतो.https://www.facebook.com/shree390

Friday, 18 October 2013

शिकार
===============

मोजून शंभर पावलांवरती
एक हरणांचा कळप होता..
दबक्या पावली, नजर रोखूनी
वाघोबा जिथे लपला होता..

वारा थबकूनी, निश्चल पाती
ना पाखरांचा आवाज होता..
काटा अंगी, धडधड हृदयी
श्वास कंठाशी अडला होता..

अवघड क्षणी न लवे पापणी
क्षण काळच थांबला होता..
निश्चिंत पाडसे बेसावध हरणी
टपल्या वाघाचा घास होता..

अंतर घटले घटका भरली

अवघा झेपेचा अवकाश होता..

दृष्टा दृष्टीत खेळी पालटली

हरणे पांगली सावध होता..

चराचराचा सुटकारा ऐकुनी

वाघ जागी खोळंबला होता..

एक कटाक्ष, गुरगूर हलकी

सांगे दरारा आहे नि होता..!

तुझे सुख, तुझे सुख
माझ्या ओठावर साज..
तुझे दु:ख, तुझे दुःख
माझ्या काळजात कळ..!
तुला मला व्यापणारं मनी मायाळू आभाळ.

तुझ्या क्षेमकुशलावीनं,
सैरभैर माझा जीव..
सुखा सुखी आतड्यास
सये जीवघेणा पीळ..!
तुला मला जोडणारी आपुलकीची जणू नाळ.

तुझ्या सुखावीनं मज
माझ्या सुखावीनं तुज
कडू साखरेचा घास..!
तूच ध्यास, तूच बळ..
तुझ्या माझ्या जाणिवेस स्नेहभरी रसाळ फळ.

तुझ्या मार्गी तू ठाम
मी चोखंदळते माझी वाट
"सर्वे सुखिनः भवंतु..!"
भावबंधी हीच ओळ,
तुझ्या माझ्या प्रार्थनेत समष्टीस एकच गळ.

एक वसा घेच आज..
माझ्या वाट्याच्या सुखावर
नको जळू तीळभर,
नको मीठ चोळण्याचा छळ
तुझ्या माझ्या जगण्यास सहानुभूतीच गं मूळ.

तुझ्या माझ्या अंगणात
काही काटे, काही फुलं..
ओंजळभर आनंदास्तव
गोड ऊन पावसाची झळ..!
तुझ्या माझ्या स्वप्नात वसो निरामय गोकूळ...!!