तुझे सुख, तुझे सुख
माझ्या ओठावर साज..
तुझे दु:ख, तुझे दुःख
माझ्या काळजात कळ..!
तुला मला व्यापणारं मनी मायाळू आभाळ.
तुझ्या क्षेमकुशलावीनं,
सैरभैर माझा जीव..
सुखा सुखी आतड्यास
सये जीवघेणा पीळ..!
तुला मला जोडणारी आपुलकीची जणू नाळ.
तुझ्या सुखावीनं मज
माझ्या सुखावीनं तुज
कडू साखरेचा घास..!
तूच ध्यास, तूच बळ..
तुझ्या माझ्या जाणिवेस स्नेहभरी रसाळ फळ.
तुझ्या मार्गी तू ठाम
मी चोखंदळते माझी वाट
"सर्वे सुखिनः भवंतु..!"
भावबंधी हीच ओळ,
तुझ्या माझ्या प्रार्थनेत समष्टीस एकच गळ.
एक वसा घेच आज..
माझ्या वाट्याच्या सुखावर
नको जळू तीळभर,
नको मीठ चोळण्याचा छळ
तुझ्या माझ्या जगण्यास सहानुभूतीच गं मूळ.
तुझ्या माझ्या अंगणात
काही काटे, काही फुलं..
ओंजळभर आनंदास्तव
गोड ऊन पावसाची झळ..!
तुझ्या माझ्या स्वप्नात वसो निरामय गोकूळ...!!
माझ्या ओठावर साज..
तुझे दु:ख, तुझे दुःख
माझ्या काळजात कळ..!
तुला मला व्यापणारं मनी मायाळू आभाळ.
तुझ्या क्षेमकुशलावीनं,
सैरभैर माझा जीव..
सुखा सुखी आतड्यास
सये जीवघेणा पीळ..!
तुला मला जोडणारी आपुलकीची जणू नाळ.
तुझ्या सुखावीनं मज
माझ्या सुखावीनं तुज
कडू साखरेचा घास..!
तूच ध्यास, तूच बळ..
तुझ्या माझ्या जाणिवेस स्नेहभरी रसाळ फळ.
तुझ्या मार्गी तू ठाम
मी चोखंदळते माझी वाट
"सर्वे सुखिनः भवंतु..!"
भावबंधी हीच ओळ,
तुझ्या माझ्या प्रार्थनेत समष्टीस एकच गळ.
एक वसा घेच आज..
माझ्या वाट्याच्या सुखावर
नको जळू तीळभर,
नको मीठ चोळण्याचा छळ
तुझ्या माझ्या जगण्यास सहानुभूतीच गं मूळ.
तुझ्या माझ्या अंगणात
काही काटे, काही फुलं..
ओंजळभर आनंदास्तव
गोड ऊन पावसाची झळ..!
तुझ्या माझ्या स्वप्नात वसो निरामय गोकूळ...!!
No comments:
Post a Comment