Total Pageviews

Friday, 18 October 2013

शिकार
===============

मोजून शंभर पावलांवरती
एक हरणांचा कळप होता..
दबक्या पावली, नजर रोखूनी
वाघोबा जिथे लपला होता..

वारा थबकूनी, निश्चल पाती
ना पाखरांचा आवाज होता..
काटा अंगी, धडधड हृदयी
श्वास कंठाशी अडला होता..

अवघड क्षणी न लवे पापणी
क्षण काळच थांबला होता..
निश्चिंत पाडसे बेसावध हरणी
टपल्या वाघाचा घास होता..

अंतर घटले घटका भरली

अवघा झेपेचा अवकाश होता..

दृष्टा दृष्टीत खेळी पालटली

हरणे पांगली सावध होता..

चराचराचा सुटकारा ऐकुनी

वाघ जागी खोळंबला होता..

एक कटाक्ष, गुरगूर हलकी

सांगे दरारा आहे नि होता..!

No comments:

Post a Comment